!-- afp header code starts here -->

जळगावात घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


An interstate gang involved in burglaries in Jalgaon has been apprehended by the MIDC police जळगाव (4 फेब्रुवारी 2026) : शहरात घरफोड्या करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून दोन आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले अअसून आरोपींकडून घरफोडीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली.

बंद घराला केले टार्गेट
जळगावातील अयोध्या नगरातील रहिवासी पंढरीनाथ पाटील हे सहकुटुंब धानवड (ता.जळगाव) येथे गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली तर 2 रोजी सकाळी त्यांच्या बंद घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजार्‍यांनी त्यांना फोनवरून कळवले. पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता कपाटाचे ड्रॉवर उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यप्रदेशातील दोघांना अटक
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पुनासा तहसील अंतर्गत सापळा रचून सुखदेव रामसिंग टाक (36) व आकाश दिनेश वाधे (19) यांना अटक केली तर एक विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले.

मुद्देमालासह कार जप्त
आरोपींकडून चोरी गेलेले 19 ग्रॅम सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किंमतीची कार, लोखंडी पकड, स्क्रू-ड्रायव्हर आणि एक लहान चाकू जप्त करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व सहकार्‍यांनी केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !