!-- afp header code starts here -->

गुंतवणूकदारांचे नफा वसुलीचे धोरण : चांदीच्या भावात घसरण, सोन्याचे भाव जाणले का ?


Investors’ profit-taking strategy: Did you notice the fall in silver prices and gold prices? नवी दिल्ली (10 फेब्रुवारी 2026) : गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यानं मंगळवारी सकाळी वायदेबाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 1.6 टक्क्यांनी म्हणजेच 2500 रुपयांनी घसरुन एक लाख 55 हजार 546 रुपयांवर आले तर चांदीच्या वायद्याचे दर चार टक्क्यांनी घसरले. चांदीचे दर दोन लाख 51 हजार 544 रुपयांवर पोहोचले आहेत.

काय घडले आंतरराष्ट्रीय बाजारात?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये 1.4 टक्क्यांनी घसरले आहेत. सोन्याचे दर 5000 डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत. 29 जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सोन्याचे दर 10 टक्क्यांनी घसरले आहेत. सिंगापूरमध्ये 8.00 वाजता स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरुन 5032.53 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. चांदीचे दर 1.8 टक्के म्हणजे 81.92 डॉलरनं घसरले आहेत.

अमेरिकन डॉलर निर्देशांक 96.82 वरुन वाढून 97.01 वर पोहोचला आहे. विदेशी खरेदीदारांसाठी डॉलर आधारित सोनं महागलं आहे. अमेरिकन रोजगार आणि महागाई संदर्भातील आकडेवारी येण्यापूर्वी गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.

जानेवारी महिन्याच्या शेवटी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. भूराजनैतिक संघर्ष, केंद्रीय बँकांची सोन्याची खरेदी यामुळं सोन्याच्या दरातील वाढ पाहायला मिळाली होती.

सराफा बाजारातील सोन्याचे दर
सराफा बाजारात सोन्याचे 9 फेब्रुवारीचे दर पाहिले असता 24 कॅरेट सोन्याचा दर 154880 रुपये होता तर 22 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 151160 रुपये आहेत. 20 कॅरेट सोन्याचे दर 137840 रुपये आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 125450 रुपये तोळा आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 99900 रुपये तोळा असा आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !