!-- afp header code starts here -->

आमदार रोहित पवार म्हणाले ; कधी-कधी चालकाला ठार मारणेच पुरेसे असते !


MLA Rohit Pawar said; Sometimes killing the driver is enough! मुंबई (13 फेब्रुवारी 2026) : अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर त्यांनी आता व्हीएसआर विमान कंपनीवर कारवाई का झाली नाही ? असा प्रश्न उपस्थित करीत निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जाते. चुकीचे काम करणार्‍या अधिकार्‍याला बडतर्फ केले जाते मग जीवघेणी सेवा देणार्‍या विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? हे न उमजणारे कोडे असल्याचे ते म्हणाले. कधी-कधी चालकाला ठार मारणेच पुरेसे असते, असे नमूद करत पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरही संशय व्यक्त केला.

दाव्या-प्रतिदाव्यांनी खळबळ
अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांच्या नेत्यांनी या अपघाताविषयी संशय व्यक्त केला. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी मुंबई व दिल्लीत विस्तृत पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांच्या शेवटच्या काही तासांतील घटनाक्रमावर बोट ठेवले आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असताना आता त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न केला आहे.


काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणार्‍या अधिकार्‍याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणार्‍या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय तडठ कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?

देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या व्हीएसआर कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचार्‍यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.

कधी कधी चालकाला ठार मारणे, एवढेच पुरेसे असते
रोहित पवारांनी ’राईज अँड किल फर्स्ट’ या पुस्तकातील एका संवादाचा दाखला देत अजित पवारांच्या विमानाच्या पायलटवार कुणाचा दबाव होता का? असाही प्रश्न केला आहे. ते या पुस्तकाचा दाखला देत म्हणाले, अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !