काय सांगता ! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ठेवला साप : रेल्वे सुरक्षा बलाने आवळल्या मुसक्या
What can you say! Snake kept in Vande Bharat Express: Railway Protection Force smiles भुसावळ (14 फेब्रुवारी 2026) : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणार्यास अटक करण्यात यश मिळवले आहे. 27 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी 37 वर्षीय जगन अर्जुन भाले (रा.नाशिक जिल्हा) याला 12 फेब्रुवारी 2026 रोजी मुंब्रा येथून कल्याण आरपीएफने कारवाई करीत ताब्यात घेतले.
अशी आहे नेमकी घटना
घटनेनुसार, 27 डिसेंबर 2025 रोजी गाडी क्रमांक 22225 च्या सी-16 या डब्यातील शौचालयात साप आढळून आला होता. ही बाब लक्षात येताच संबंधित शौचालय तात्काळ बंद करून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. सोलापूर स्थानकावर साप सुरक्षितरीत्या पकडण्यात आला. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे एका अज्ञात व्यक्तीने शौचालयात साप ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रेल्वे कायदा 1989 अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरपीएफ पथकाने संशयीताचा माग काढत मुंब्रा येथून त्याला अटक केली.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
चौकशीदरम्यान त्यांने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. संशयीताला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या कारवाईतून आरपीएफने कमी वेळेत प्रकरण उघडकीस आणत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतची सतर्कता व तपास कौशल्य पुन्हा अधोरेखित केले आहे. आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.






