रावेरात व्यापार्याला अडवत 15 हजार लूटले
15,000 was looted by intercepting a merchant in Raver रावेर (20 फेब्रुवारी 2026) : 65 वर्षीय किराणा व्यापार्याला दुचाकीवर बसवून नेत त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना रावेरात घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले रावेरात ?
फिर्यादी गोवर्धनदास सफरमल कोटवानी (65, रा.स्टेशन रोड, रावेर) हे आपला किराणा व्यवसायाचे पैसे जमा करून परतत असताना ही घटना घडली. 18 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने त्यांना आपल्या मोटरसायकलवर बसवले. काही अंतर गेल्यानंतर, पारश्या नाल्याजवळील एका शेताजवळ त्याचे इतर दोन साथीदार आधीच दबा धरून बसले होते. त्या ठिकाणी या तिघांनी मिळून कोटवानी यांच्याकडील किराणा मालाचे जमा केलेले एकूण 15 हजार रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला.

या घटनेनंतर गोवर्धनदास कोटवानी यांनी गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.







