सोन्यात घसरण मात्र चांदी चमकली : ‘एमसीएक्स’वर भाव तीन लाखांवर


Gold falls but silver shines: Prices cross Rs 3 lakh on MCX नवी दिल्ली (11 मार्च 2026)  : अमेरिका-इराण युद्धाच्या संमिश्र संकेतांमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत सध्या मोठी धामधूम सुरू आहे. एमसीएक्सवर बुधवारी सकाळी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली असली, तरी किरकोळ बाजारात चांदीने मात्र तीन लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

सोन्यात घसरण, चांदीत संमिश्र कल
बुधवारी सकाळी 9 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 457 रुपयांनी घसरून 1,62,846 रुपयांवर आले. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रति किलो 1,765 रुपयांनी घसरून 2,76,085 रुपयांवर व्यवहार करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी ’सेफ हेवन’ मानल्या जाणार्‍या सोन्यातून नफेखोरी केल्याचे चित्र आहे.




चांदीने चेन्नईत केला तीन लाखांचा टप्पा पार
सराफा बाजारात चांदीच्या किमतीत गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत चांदीचा दर दोन लाख 90 हजार 100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे मात्र चेन्नईने सर्वांना मागे टाकत 3,00,100 रुपयांचा विक्रमी स्तर गाठला. गेल्या दोन दिवसांत दिल्लीत चांदीच्या दरात एकूण 10 हजार 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !