सावदा पोलिसांची मोठी कारवाई : एक लाख 95 हजारांची गांजाची झाडे जप्त
Big action by Savda police : Ganja plants worth Rs 1.95 lakh seized सावदा (12 मार्च 2026) : सावदा पोलिसांनी गांजा शेतीवर कारवाई करीत एक लाख 94 हजार 72 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर एका आरोपीस अटक करण्यात आली. या कारवाईने अवैधरित्या गांजा शेती फुलवणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
निलेश रमेश पाटील उर्फ पिंटू (44, रा.प्लॉट एरिया, सावदा, ता.रावेर) याने सावदा शिवारातील शेत गट क्रमांक 463 मध्ये हरभरा पिकाच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केली. कोणतीही शासकीय परवानगी न घेता या शेतात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी कारवाई केली.




10 मार्च 2026 रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकत शेतातून 93 कॅनाबीस (गांजा) झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन सुमारे 28 किलो 540 ग्रॅम इतके असून त्यांची अंदाजे बाजारातील किंमत एक लाख 94 हजार 72 रुपये आहे. या प्रकरणी आरोपी निलेश पाटील यास पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल शिवाजी सानप, पोलीस हवालदार निलेश बाविस्कर, संजीव चौधरी, राजेंद्र वैदकर, उमेश पाटील, सुनील सैंदाणे, बबन तडवी, मनोज तडवी तसेच होमगार्ड पथकातील कर्मचार्यांनी केली.