उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव

मध्यवर्ती ठिकाणी जळगावात महादेव हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची टीम सज्ज


जळगाव (12 मार्च 2026) : वाढत्या तापमानामुळे खान्देशात उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ञांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटलमध्ये उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यात प्रचंड डोकेदुखी होणे, चक्कर येणे किंवा शरीरात कमालीचा अशक्तपणा जाणवणे, उलट्या होणे किंवा मळमळणे, शरीर अतिउष्ण होणे (ताप येणे), शुद्ध हरपणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणे दिसू शकतात.





वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे रुग्णांच्या तत्काळ तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व आधुनिक सोयी-सुविधा येथे सज्ज आहेत.

संपर्क व आपत्कालीन मदतकरिता उष्माघाताचा त्रास जाणवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन: 9112030055, 9112040055, 9325150004 संपर्क साधावा. वाढत्या उन्हात शक्यतो बाहेर जाणे टाळावे आणि भरपूर पाणी पिऊन स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !