शासकीय दरापेक्षा चढ्या दराने स्टॅम्प पेपरची विक्री : पाचोर्‍यातील दोघा भावंडांना जळगाव एसीबीकडून अटक


Sale of Stamp Papers at Rates Exceeding Government Norms:  Two Siblings from Pachora Arrested by Jalgaon ACB पाचोरा (18 मार्च 2026) : शासकीय मुद्रांकाची (स्टॅम्प पेपर) चढ्या दराने विक्री करताना पाचोर्‍यातील दोघा भावंडांना जळगाव एसीबीने पकडत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने चढ्या दराने मुद्रांक विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश ईश्वरलाल संघवी (49) व प्रशांत ईश्वरलाल संघवी (53, दोन्ही रा.विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
योगेश ईश्वरलाल संघवी (49, पाचोरा) हे जैन पाठशाळेजवळील प्रशांत झेरॉक्स दुकानातून मुद्रांक विक्रीचा व्यवसाय करतात. रविवार, 15 मार्च रोजी तक्रारदारास बँकेच्या कामासाठी 500 रुपयांच्या दराचे 10 स्टॅम्प पेपर हवे असल्याने तक्रारदाराने स्टॅम्प पेपरची मागणी केल्यावर योगेश संघवी यांनी ठरलेल्या किंमतीव्यतिरिक्त 500 रुपये अधिक देण्याची मागणी केली. जास्त पैसे दिल्याशिवाय स्टॅम्प मिळणार नाही, असे स्पष्ट सांगत आधारकार्ड आणण्यास सांगितले. यावर तक्रारदाराने नकार देत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.



सापळा रचून अटक
जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवार, 17 मार्च रोजी सापळा रचला. तक्रारदाराला खूण केलेल्या नोटा देऊन ‘प्रशांत झेरॉक्स’ येथे पाठवण्यात आले. त्यावेळी योगेश संघवी यांचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी यांनी स्टॅम्प देत पाच हजार 500 रुपये स्वीकारले. यामध्ये 500 रुपये अधिक घेतल्याचे स्पष्ट होताच पथकाने प्रशांत संघवी यांना रंगेहात पकडले. दरम्यान, योगेश संघवी हे देखील दुकानात आले होते. त्यांनी जादा रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही भावांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला. तपास निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !