ट्रान्सफार्मरची चोरी करणारी भुसावळातील टोळी वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात


Bhusawal-based gang stealing transformers lands in Varangaon Police net वरणगाव (20 मार्च 2026) : वरणगाव पोलिसांनी गस्तीदरम्यान वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरची (रोहित्र) चोरी करणार्‍या सात जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींच्या अटकेने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पाठलाग करीत संशयीत जाळ्यात
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल व पथक गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना नागेश्वर महादेव मंदिराजवळ एका पिकअप व्हॅनला (एम.एच.19 सी.वाय. 975) ला थांबवण्याचा प्रयत्न केला पण चालकाने पळ काढताच पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. ही गाडी उज्जनी मागनि बोडवडकडे निघताच बोदवड पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यात चोरी केलेले ट्रान्सफार्मर आढळले.


या संशयीतांविरोधात गुन्हा
वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत अर्जुन सोनवणे, रवींद्र भील, धीरज जोहरे, आरबाज शहा फकीर, गौरव इंगळे, शुभम सोनवणे (सर्व रा.पिंपळगाव खुर्द, ता. भुसावळ), कामरानशहा महेमुद शहा फकीर (रा.आर्यन कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. दिड लाख रुपये किंमतीचे रोहित्र व पाच लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी साहेबराव कोळी, फिरोज पठाण, लतीफ तडवी, सुकराम सावकारे आणि गोपीचंद सोनवणे यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !