भुसावळात गोळीबार करून लूट करणार्या आरोपीला गावठी कट्ट्यासह पकडले
नशिराबाद पोलिसांची कामगिरी : डमी कट्टाही पोलिसांकडून जप्त
Accused who committed robbery at gunpoint in Bhusawal arrested with a country-made pistol. भुसावळ (24 मार्च 2026) : भुसावळात गोळीबार करून लूट करणार्या आरोपीला नशिराबाद पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा तसेच एक डमी कट्टाही जप्त करण्यात आला आहे. चेतन सूर्यभान पाटील (18, रा.वरची आळी, नशिराबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
भुसावळात केला होता गोळीबार
बुधवार, 17 डिसेंबर 2025 रोजी भुसावळच्या जळगाव नाका परिसरातून खळवाडीकडे जाणार्या पुलाच्या बाजूला स्व.नारायण पाटील व्यापारी संकुलाजवळ असलेल्या पान टपरीच्या आडोशाला उल्हास पाटील हे उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टपरीजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली व रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उल्हास गणेश पाटील यांनी संशयीताना विरोध केल्यानंतर एकाने सोबत आणलेल्या कट्यातून एक गोळी झाडल्याने ती उल्हास पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. आरोपी घटनेनंतर पसार झाले होते तर काही दिवसांनी काही आरोपींना पकडण्यात आले असलेतरी चेतन पाटील हा पसार होता. नशिराबाद पोलिसांनी त्याला नशिराबाद बसस्थानक परिसरातून बेड्या ठोकल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद एपीआय योगिता नारखेडे, एएसआय राजेश मेढे, हवालदार कमलाकर बागुल, कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, कॉन्स्टेबल पंकज सोनवणे, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल विजय अहिरे आदींच्या पथकाने केली.




