भोंदू अशोक खरात प्रकरणातील असंतोष भोवला : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा


मुंबई (28 मार्च 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातमध्ये अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांना यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांना आता पक्षातील अंतर्गत रोषामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

पक्षात वाढला असंतोष
रुपाली चाकणकरांविरोधात पक्षात असंतोष वाढीस लागल्याने अखेर शुक्रवारी चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. त्यानंतर राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, असा दावा चाकणकरांनी राजीनामा पत्रात केला आहे.


‘माइंड रीडिंग’च्या आडून अशोक खरात करायचा महिलांचे शोषण
लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात याने ‘माइंड रीडिंग’व्दारे अडचणीतील महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा व नंतर संबंधितांच्या भूतकाळातील गुप्त गोष्टी सांगून आणि भविष्याची भीती दाखवून तो त्यांना संमोहित करून नंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी धक्कादायक माहिती पोलिस कोठडीत समोर आली आहे. तुमच्या आयुष्यात काय चाललंय, हे मला सर्व समजते, असे भासवून खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा.

पूजेच्या नावाखाली शोषण
एकदा का महिला त्याच्या मानसिक जाळ्यात अडकल्या की, ‘गुपित सल्ला’ आणि ‘विशिष्ट उपचारांच्या’ बहाण्याने त्यांना कार्यालयात बोलावले जायचे. तिथे पूजेच्या नावाखाली त्यांचे शोषण केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावर शिकला माइंड रिडिंग खरातने सोशल मीडियावरील ‘माईंड रीडिंग’ चे व्हिडिओ पाहून हे तंत्र आत्मसात केले होते. या थेरपीचा वापर करून तो समोरच्या व्यक्तीच्या मनातील भीती ओळखायचा. स्त्रियांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील गुपिते सांगून तो त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवत होता.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !