भुसावळात उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका बैठक
भुसावळ (28 मार्च 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार, 29 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील तनारीका हॉटेल, वरणगाव रोड, भुसावळ येथे मनसेची तालुका बैठक होत आहे.
भुसावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी सेना व महिला सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जळगांव जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, शहराध्यक्ष दीपक सोनवणे आदींनी केले आहे.





