भुसावळात मनसेच्या बैठकीत काम न करणारे पदाधिकारी फैलावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका बैठकीत पक्ष बांधणीवर चर्चा
Non-performing office bearers taken to task at MNS meeting in Bhusawal. भुसावळ (30 मार्च 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ तालुका बैठक झाली. या बैठकीत सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणी तसेच काम न करणार्या पदाधिकार्यांना खडे बोल सुनावण्यात आले.
मनसे घराघरात पोहोचण्याचे आवाहन
गजानन राणे यांनी कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन करत आगामी काळात प्रत्येक घरापर्यंत मनसे पोहोचवण्याचे आव्हान केले.

या बैठकीस मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड.जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, तालुका सचिव विलास कोळी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक भंगाळे, तालुकाध्यक्ष प्रणय भागवत, शहराध्यक्ष वैभव सुरवाडे, कुणाल वारके, रोशन बोरनारे इत्यादी उपस्थित होते. या बैठकीमुळे भुसावळ तालुका मनसेच्या संघटनाला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसेची ताकद प्रकर्षाने दिसून येईल, असा विश्वास यावेळी पदाधिकार्यांनी व्यक्त केला.




