भोंदू अशोक खरातचा मुलगा चौकशीकामी ताब्यात ; पत्नी अटकेच्या भीतीने पसार !


Son of Fraudster Ashok Kharat Taken into Custody for Questioning; Wife Absconds Fearing Arrest! नाशिक (1 एप्रिल 2026) : राज्यात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवीन फसवणूक समोर आली आहे. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात पसार झाली असून खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.

मुलासमोर अशोक खरातची चौकशी होणार
अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्यानं त्याच्यासमोर मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नसल्यानं तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचं एसआयटीचे लक्ष आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. आज अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


खरातला 14 दिवसांची कोठडी
अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून दुसर्‍या गुन्ह्यात त्याला पुन्हा उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या संशयीतांची झाली चौकशी
एसआयटीकडून अशोक खरातची मंगळवारी पुण्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. एसआयटीनं चौघांची सहा तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीतून खडे, रत्न सोन्याच्या बदल्यात अशोक खरात बनवा-बनवी करत असल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाचीही माहिती चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. एका बँकेचा मॅनेजर आणि इतरांना मिळून अशोक खरातने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा एसआयटीला संशय आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या सोन्याच्या किंमतीत खरेदी-विक्रीमध्ये लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !