भुसावळ रेलसिटी इनरव्हील क्लबतर्फे ग्रामीण भागात मानसिक आरोग्यावर जनजागृती


Bhusawal Railcity Inner Wheel Club Conducts Mental Health Awareness Campaign in Rural Areas भुसावळ (1 एप्रिल 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने धनाजी नाना महाविद्यालयात मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी नागपूर येथील आंतरराष्ट्रीय व कॉर्पोरेट मोटिवेशनल स्पीकर तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ.योगिता पांडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण, नैराश्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी याबाबत सविस्तर माहिती देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास सुमारे 300 विद्यार्थी व 30 शिक्षक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण भागात अशा प्रकारचा मानसिक आरोग्यावरील उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वायकोळे, प्रकल्प अध्यक्षा डॉ.किर्ती चांदवडकर तसेच मोना भांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !