लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा : केवायसीसाठी एप्रिलपर्यंत मुदतवाढ


Major Relief for Beneficiaries of the ‘Ladki Bahin’ Scheme: Deadline for KYC Extended Until April मुंबई (1 मार्च 2026) : लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींना 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी बंधनकारक होती मात्र योजनेतील लाभार्थींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केवायसीची मुदत एका महिन्यांनी वाढवण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

केवळ निकष पूर्ण करणार्‍या महिलांना आता योजनेचा लाभ
या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर सरकारने अशा महिलांची नाव या योजनेतून वगळण्यासाठी केवायसी बंधनकारक केली. या केवायसीसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत होती मात्र ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी केली नाही, त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत.


मात्र अशा देखील काही महिला होत्या ज्यांनी केवायसी करूनदेखील तसेच त्या या योजनेसाठी पात्र असताना देखील त्यांची नाव या योजनेतून वगळण्यात आली होती, कारण त्यांच्या केवायसीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या होत्या. दरम्यान त्यानंतर या तांत्रिक चुका दुरूस्त करण्यासाठी राज्य सरकारने लाभार्थी महिलांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

31 मार्चपर्यंत या चुका दुरूस्त करून घ्याव्यात, असं आव्हान सरकारने केलं होतं. दरम्यान केवायसीला मुदत वाढ मिळावी अशी इच्छा अनेक लाभार्थी महिलांच्या मनात होती. अखेर ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. लाभार्थी महिलांना आता केवायसी करण्यासाठी 31 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !