खाजगी वाहनांवर लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईट्स लावणारे वाहनधारक रडारवर : मुंबईत मंत्रालय परिसरातच मोठी कारवाई
Vehicle Owners Installing Red, Blue, and Yellow Flashing Lights on Private Vehicles Under the Scanner : Major Crackdown Launched Right Within the Mantralaya Precinct in Mumbai मुंबई (3 एप्रिल 2026) : मुंबई मंत्रालय आणि विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांवर लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईट्स तसेच सायरन वापरले जात असल्याच्या तक्रारी वाढताच वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणार्या 80 वाहनधारकांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या वाहनांवरील अवैध साहित्य जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सलग कारवाईने उडाली खळबळ
तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आणि एकामागून एक वाहनांची तपासणी करत 80 गाड्यांवर कारवाई केली. संबंधित वाहनांवरील सर्व बेकायदा दिवे आणि सायरन जप्त करण्यात आले असून वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली.


कुणाला आहे दिवे लावण्याचा अधिकार ?
नियमांनुसार, अशा प्रकारचे दिवे आणि सायरन केवळ आपत्कालीन सेवा, कायदा-सुव्यवस्था राखणार्या यंत्रणा आणि अधिकृत शासकीय वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे मात्र काही वाहनचालक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा वाहतुकीत सवलत मिळवण्यासाठी या सुविधा बेकायदेशीररित्या वापरत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या वापरामुळे इतर वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि काही वेळा वाहतूक नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अशा बेकायदा दिवे आणि सायरनचा वापर करून काही गंभीर गुन्ह्यांमध्येही गैरफायदा घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाकडे केवळ वाहतूक नियमभंग म्हणून न पाहता, सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर बाब म्हणून पाहिले जात आहे. याच कारणामुळे पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्ण
य घेतला आहे.






