भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पुरस्कार वितरण


Annual Awards Distribution at Biyani Military School in Bhusawal भुसावळ (4 एप्रिल 2026) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, कार्यकारी संचालिका स्मिता बियाणी, प्रवीण भराडीया उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुणवंत प्राप्त अशा पाचशे विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस व सर्टीफिकेट वितरण करण्यात आले.


याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यवेक्षक रवींद्र तायडे व निवृत्ती पाटील तर प्राचार्य डी.एम.पाटील यांनी आभार मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !