भोंदू खरातच्या मुलाने रंग दाखवले : पोलिसांनी चौकशी करून सोडताच झाला ‘नॉट रिचेबल’


The Son of the Fraudster Kharat Shows His True Colors: Goes ‘Not Reachable’ Immediately After Being Released by Police Following Interrogation नाशिक (5 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली मात्र हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली व चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्यानंतर तो आता नॉट रीचेबल झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता हर्षवर्धनही गायब झाल्याने तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवत संशयीतांचा शोध सुरू केला आहे.

हर्षवर्धन नॉट रिचेबल
एसआयटीकडून भोंदू खरातच्या मुलगा हर्षवर्धनची यापूर्वी दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यांनतर त्याला घरी सोडण्यात आलं होते मात्र चौकशीनंतर खरातच्या मुलाचा फोन नॉट रीचेबल येत असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा तेथे मिळून आला नाही त्यामुळे हर्षवर्धन खरात चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का? याबाबतीत आता शंका उपस्थित केली जात आहे.


आधी पत्नी, आता लेकाचेही पलायन?
हर्षवर्धन खरात शहारात आहे की शहराबाहेर याबाबत देखील तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशी सुरू असल्यानं मुलाने शहर सोडण्यापूर्वी पोलिस अधिकार्‍यांची परवानगी घेणं अनिवार्य आहे मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब झाला का? की अन्य कुठलं कारण आहे, अशी शंका आता उपस्थित करण्यात येत आहे. मुलाचा मोबाईल नॉट रीचेबल असल्याने तो कुठे गेला? त्याच्यासोबत कोण आहे? याचादेखील पोलीस शोध घेत आहे. खरातची पत्नी देखील याआधीच गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहे. याआधीच खरातची पत्नी फरार झालेली असतानाच आता मुलगा नॉट रीचेबल असल्याने तपास यंत्रणांनी आता अधिक सजग होवून तपासाला वेग दिला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !