शहिदांच्या त्यागाची सरकारकडून दखल : शहीद झालेल्यांच्या पुत्रांना थेट पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती

‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट


Government Acknowledges Sacrifices of Martyrs: Sons of Fallen Heroes Appointed Directly as Police Sub-Inspectors मुंबई (10 एप्रिल 2026) : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत शहिदांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर थेट पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला आहे.

असा आहे शासन निर्णय
नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वारसांबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसदारांना गट-अ आणि गट-ब संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद 1009 च्या शासन निर्णयानुसार आहे. याच तरतुदीचा आधार घेत, विराज संतोष घाग आणि विकास हरिदास सयाम यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्यांना ही विशेष नियुक्ती देण्यात आली. विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करताना त्यांना ‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट घालण्यात आली असून शहिदांच्या वारसांना यामुळे न्याय मिळाल्याची भावना आहे.


शहिदांच्या त्यागाची दखल
नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्राणांची आहुती देणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कुटुंबाला वार्‍यावर न सोडता सामाजिक सुरक्षा प्रदान करणे ही सरकारची मुख्य भूमिका आहे. ‘विशेष बाब’ म्हणून थेट ‘गट-ब’ अधिकारी पदावर नियुक्ती देऊन सरकारने एक संवेदनशील प्रशासकीय पाऊल उचलले आहे. कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणार्‍या जवानांच्या कुटुंबाची जबाबदारी शासन घेते, हा सकारात्मक संदेश पोलिस दलात आणि समाजात पोहोचवणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !