यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीची प्रारूप वार्ड रचना प्रसिध्द : 13 एप्रिलपर्यंत हरकतीस मुदत
हरकतींवर निपटारा करीत अंतिम वार्ड रचना 4 मे रोजी होणार प्रसिध्द
यावल (10 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व 47 ग्रामपंचायतीची प्रारूप वार्ड रचना जाहिर करण्यात आली आहे. मंगळवारी यावल तहसील कार्यालयासह त्या त्या ग्रामपंचायतीत वार्ड रचना प्रसिध्द केली असुन त्यावर हरकती करीता दिनांक 7 ते 13 एप्रिल पर्यंत हरकती घेता येणार असुन प्राप्त हरकतींवर निपटारा करीत अंतिम वार्ड रचना दिनांक 4 मे रोजी प्रसिध्द होईल व त्यानंतर त्या त्या वाढतील सदस्यांचे आरक्षण देखील काढून निवडणुक कार्यक्रम घेतला जाणार आहे.
47 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
यावल तालुक्यातील मुदत संपत संपलेल्या व मुदत संपत असलेल्या 47 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकरीता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहे. या सर्व 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेची कार्यवाही प्रशासनाने पुर्ण केली आहे. मंगळवारी तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसिलदार बी.एम.पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्या यांच्या उपस्थितीत प्रारूप वार्ड रचना जाहिर झाली आहे. तसेच त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये या वार्ड रचनेची प्रसिध्दी करण्यात आली आहे.

संबंधीत वार्ड रचनेवर जर कुणालार काही हरकत असेल तर हरकतील करीता दिनांक 7 ते 13 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे.ज्या वार्ड संर्दभात हरकत असेल त्या बाबत लेखी स्वरूपात यावल तहसिलदार यांच्या कडे नागरीकांना हरकतीचा अर्ज देता येणार आहे. तसेच प्राप्त झालेल्या हरकतींवर निपटारा करीत जिल्हाधिकारी जळगाव यांच्या वतीने अंतीम वार्ड रचना 4 मे रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
4 मे नंतर प्रभाग निहाय आरक्षण
जिल्हाधिकारी यांच्या कडून दिनांक 4 मे रोजी अंतिम वार्ड रचना जाहिर झाल्या नंतर त्या त्या ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलावून प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे व आरक्षलण प्रक्रीये नंतर सार्वत्रीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला जाणार आहे.
अशी आहे वॉर्ड रचना व आरक्षित सरपंच पद
अनुसुचित जमाती राखीव : वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, हंबर्डी, राजोरे.
अनुसुचित जमाती महिला राखीव : कोरपावली, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द
अनुसुचित जाती राखीव : किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी, निमगाव.
अनुसुचित जाती महिला राखीव : वनोली, दुसखेडे, अंजाळे
नामाप्र : भालशीव, हिंगोणे, आमोदे, सातोद, विरावली, नायगाव
नामाप्र महिला राखीव : दहिगाव, भालोद, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र.सावदा, कोळवद, महेलखेडी
सर्वसाधारण : चिंचोली, बोरखेडा बुद्रुक, सावखेडेसिम, पिंपरूड, टाकरखेडे
सर्वसाधारण महिला राखीव : अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक,
डोणगाव, नावरे, वढोदे प्र.यावल, बोरावल बुद्रुक, आडगाव

