इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपापसणी


भुसावळ (11 एप्रिल 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, भुसावळतर्फे पुंडलिक गणपत बरहाटे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करण्याचे आवाहन
या शिबिरात भुसावळ येथील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ.आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर कमी ठेवण्याचा सल्ला देत स्क्रीन टाईम मर्यादित ठेवावा, दिवसातून दोन ते तीन वेळा डोळे स्वच्छ धुवावेत तसेच हिरव्या पालेभाज्या व गाजराचे सेवन करावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

या शिबिरात एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शाळेचे प्राचार्य पी.जे.चौधरी, हेमांगिनी चौधरी तसेच पर्यवेक्षिका जयश्री चौधरी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. या उपक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वायकोळे तसेच हेमलता सोनार व विनिता नेवे यांनी विशेष परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !