भुसावळात भाजपातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
भुसावळ (11 एप्रिल 2026) : महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्ते व समाज बांधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत जयजयकार केला. प्रसंगी भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंत माहुरकर, माजी ग्रामीण अध्यक्ष भालचंद्र पाटील, मनोज बियाणी, नगरसेवक गिरीश महाजन, सुजीत भोळे, अल्बर्ट तायडे, रुपेश देशमुख, संजय नाहाटा, बापू महाजन, ललित मराठे, कैलास पाटील, अनिता आंबेकर, शंकर शेळके, अनिरुद्ध कुलकर्णी, राहुल तायडे, चेतन सावकारे, ऋषभसिंग राजपूत, प्रशांत पाटील, योगेंद्र हरणे, गणेश जाधव, सुनील धीवरे, हेमंत सावकारे, अमोल पाटील, गोपी राजपूत, रहमान शेख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण व शोषितांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.







