श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मीना राजपूत
जळगाव (15 एप्रिल 2026) : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मीना राजपूत यांची निवड करण्यात आली. मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्धनजी हरी महाराज यांच्या आशीर्वादाने व शिलाजी गोगामेडी यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्षा सारिका पाटील यांनी ही नियुक्ती केली.
जास्तीत-जास्त महिला संघटन करण्यासह महिलांवर होणार्या अत्याचाराला प्रतिबंध लावण्यासाठी ही निवड करण्यात आली. प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, जिल्हाध्यक्ष संदीप राणा तसेच समाजातील प्रसिद्ध उद्योजक संजय पाटील, आनंदा पाटील, बी.एन.पाटील, दयानंद पाटील, शामसिंग पाटील आदी समाज बांधवानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.










