शंभर फूट दरीत बस कोसळली : 21 प्रवाशांचा मृत्यू
Bus Plunges 100 Feet into Gorge : 21 Passengers Dead उधमपूर, जम्मूकाश्मिर (20 एप्रिल 2026) : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेवून सुसाट निघालेली बस नियंत्रण सुटल्याने स्त्यापासून सुमारे 100 फूट खाली कोसळून उलटल्याने या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून 29 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी जम्मूच्या उधमपूरमध्ये घडला.
जखमींच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि ती भरधाव वेगाने धावत होती. कागोट नाल्याजवळ अचानक एक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यापासून खाली कोसळली. या अपघातात बसचा वरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, अपघातात सामील असलेली बस सार्वजनिक वाहतुकीचे वाहन होते. जखमींवर जीएमसी उधमपूर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची भरपाई जाहीर केली.
अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, बसमधील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि अतिवेग यामुळे हा अपघात झाला. जखमी प्रवाशांची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की चालक खूप वेगाने गाडी चालवत होता. टायर फुटल्यामुळे बसचा वेग नियंत्रणात राहिला नाही, ज्यामुळे ती सुमारे 100 फूट उंचीवरून खाली कोसळली.


