शिरपूर तालुका हादरला : फोन न केल्याने पत्नीची डोक्यात दगड टाकून हत्या
Shirpur Taluka Shaken: Wife Murdered by Striking Her Head with a Stone for Not Making a Phone Call शिरपूर (20 एप्रिल 2026) : फोन का केला नाही ? या क्षुल्लक कारणावरून संतप्त पतीने पत्नीची डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची संतापजनक व तितकीच धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावात घडली. या घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपी पतीला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावात सुनील सायमल पावरा (30) हा पत्नी ललितासह वास्तव्यास आहे. सुनील पावरा हा चार ते पाच बाहेरगावी असताना त्याला पत्नी ललिता पावरा हिने फोन न केल्याच्या रागातून त्याने 19 रोजी पत्नीशी घरी आल्यानंतर वाद घातला व तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केली. खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला सुनील पावरा यास अटक केली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे , अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एएसआय मनोज कचरे, हवालदार राजू ढिसले, हवालदार अनिल चौधरी, हवालदार जाकिर शेख, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, चालक हवालदार अल्ताफ मिर्झा, कॉन्स्टेबल ईसरार फारुकी आदींनी केली.

