नशिराबाद पोलिसांची कामगिरी : सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह जाळ्यात


Nashirabad Police Action: Hardened Criminal Nabbed with Country-made Pistol भुसावळ (20 एप्रिल 2026) : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नशिराबादच्या बसस्थानक भागात आल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी संशयीताला ताब्यात घेत कट्टा जप्त केला. या प्रकरणी संशयीत कमलाकर प्रभाकर महाजन ( 36, रा.वरची अळी, नशिराबाद) यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नशिराबाद बस स्टॅण्ड परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन हा सराईत आरोपी स्वतःकडे कट्टा बाळगून दहशत निर्माण करत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे यांना रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रात्री 7.30 वाजेच्या सुमारास कमलाकर महाजन यास शस्त्रासह ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक हरेश पाटील, चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि समीर सैय्यद आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !