सायबर चोरट्यांचा प्रताप : दहशतवाद्यांसाठी बँक खाते वापरल्याची भीती घालत ज्येष्ठाला 18 लाखांचा गंडा
Cyber Crooks’ Modus Operandi : Senior Citizen Swindled Out of ₹18 Lakhs After Being Threatened with Allegations of Using Bank Account for Terrorists पुणे (23 एप्रिल 2026) : दहशतवादी कारवायांमध्ये बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून आणि अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाला सायबर भामट्यांनी 18 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
धमकीला बळी पडल्याने फसवणूक
फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. दहशतवादी कारवाईत त्यांच्या बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगत, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्याची धमकी दिली. या धमक्यांना बळी पडून ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी 18 लाख रुपये जमा केले.

पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

