महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू : रुग्णांना मिळणार मोफत उपचार !


Mahatma Jyotirao Phule Health Scheme Implemented at Mahadev Hospital : Patients to Receive Free Treatment! जळगाव (24 एप्रिल 2026) : जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील सुपर स्पेशॅलिटी सुविधा असलेल्या एकमेव महादेव हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महादेव हॉस्पिटल हे जळगाव शहरातील 24 तास सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार देणारे सुसज्ज रुग्णालय म्हणून ओळखले जाते. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यांच्या सहाय्याने येथे विविध आजारांवर प्रभावी उपचार केले जातात. आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू झाल्यामुळे या रुग्णालयात अनेक स्पेशॅलीटी, सुपर स्पेशॅलिटी आणि अतिदक्षाता विभागात गंभीर तसेच सर्वसाधारण आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना परवडणार्या दरात नव्हे तर मोफत आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महादेव हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्याने जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य सेवेत एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

दर्जेदार उपचाराची सुविधा
हृदयविकार, मेंदू व न्यूरो, हाडांचे फ्रॅक्चर व सर्जरी, किडनी, स्टोन व डायलिसिस, कॅन्सर, बालरोग व महिला आजार, कान-नाक-घसा ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स इ. शस्त्रक्रिया आर्थिक अडचणीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि तत्पर उपचार देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत राहू. याचबरोबर योजनेअंतर्गत भरती झालेल्या रुग्णांचा कोणताही एक सीटी स्कॅन किंवा एमआरआय आम्ही मोफत करणार असल्याचे महादेव हॉस्पीटलचे संचालक डॉ.प्रशांत वारके म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !