जळगाव जिल्ह्यात आपले सेवा सेतु केंद्राचे ‘महा ई सेवा पोर्टल’ बंद : जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
जळगाव (30 एप्रिल 2026) : जळगाव जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राची महाआयटी कंपनी लि. या कंपनीने चालविलेल्या आपले सेवा सेतु केंद्र महा ई सेवा पोर्टल मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यासह शासकिय कामासाठी लागणारे दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संदर्भात जळगाव जिल्हाधिकार्यांकडे भुसावळचे माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी तक्रार केली आहे.
सर्व्हर डाऊन असल्याचे कारण
महाआयटी कंपनी लि. या कंपनीच्या म्हणण्यानुसार मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे पोर्टल बंद आहे मात्र यामुळे सर्व नागरिकांना शासकिय तर विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी भुसावळचे केदार सानप यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी तसेच संबंधित पोर्टल विनाविलंब सुरू करण्याची मागणी व विनंती सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तक्रार अर्जाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

