तापीत उडी घेतलेल्या किनगावातील तरुणाचा मृतदेहच अखेर हाती
यावल (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तापी नदीच्या पात्रात किनगाव खुर्द येथील 29 वर्षीय तरुणाने उडी घेतली होती व तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता. या तरुणाचा मृतदेह सावखेडा, ता.अमळनेर येथील तापी नदीच्या पात्रात आढळला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
किनगाव खुर्द, ता.यावल या गावातील रहिवासी निलेश मधुकर धनगर (29) हा तरुण रागाच्या भरात घरून मोटरसायकल घेऊन कोळन्हावी जवळील तापी नदीच्या पुलावर गेल्यानंतर त्याने मोटरसायकल लावून त्याने पाण्यात उडी घेतली. त्यानंतर तरुण बेपत्ता झाला होता मात्र या तरुणाचा मृतदेह सावखेडा, ता.अमळनेर गावाजवळील तापी नदीच्या पात्रात आढळला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश पाटील करीत आहे.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृत तरुणावर किनगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही.
