मोदी है तो मुमकीन है… ! आसामसह पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता


Modi Hai To Mumkin Hai… ! BJP rule in West Bengal including Assam नवी दिल्ली (4 मे 2026) : देशातील पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी समोर आला असून केरळ आणि तामिळनाडू वगळता भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली असून तामिळनाडूत विजय थलपतिच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकून 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.

तृणमूलची सत्ता उलथवली
भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. गेली 15 वर्षे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती मात्र ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाल्याने आता भारतामधील आणखी एक राज्य भाजपच्या ताब्यात आले आहे. यामुळे देशातील भाजपशासीत राज्यांची संख्या वाढली आहे.

पश्चिम बंगालच्या विजयानंतर आता देशातील 22 राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप आघाडीचे सरकार असेल. हे भाजपासाठी खूप मोठे यश मानले जात आहे तर दुसरीकडे केरळच्या रुपाने डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला आहे. केरळमधून डाव्यांचे सरकार गेल्याने आता ’डावेमुक्त भारत’ झाला आहे.

या राज्यांमध्ये नमो-नमो (भाजपा) सरकार
महाराष्ट्र
हरियाणा
दिल्ली
राजस्थान
गुजरात
मध्यप्रदेश
गोवा
उत्तराखंड
उत्तरप्रदेश
बिहार
सिक्कीम
मेघालय
अरुणाचल प्रदेश
नागालँड
मणिपूर
आसाम
त्रिपुरा
पश्चिम बंगाल
ओदिशा
छत्तीसगढ
आंध्र प्रदेश
पुद्दुचेरी

उर्वरित राज्यांमध्ये या पक्षाची सत्ता
पंजाब- आम आदमी पार्टी
मिझोराम- झेडपीएम
झारखंड- झारखंड मुक्ती मोर्चा
केरळ- काँग्रेस
तामिळनाडू- टीव्हीके
हिमाचल प्रदेश- काँग्रेस
कर्नाटक- काँग्रेस
तेलंगणा- काँग्रेस


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !