उपोषण अस्त्राला यश : भडगाव ते वाडे बंद बस फेर्‍यांना अखेर सुरूवात


भडगाव (10 मे 2026) : भडगाव ते वाडे मुक्कामीसह तीन बसफेर्‍या पाचोरा आगाराने 13 एप्रिलपासून अचानक बंद केल्या होत्या. या बंद बस फेर्‍या तात्काळ सुरु करण्यात याव्यात यासाठी वाडे येथील नागरीक, पत्रकार अशोक परदेशी यांनी भडगाव तहसील कार्यालयासमोर प्रवाशांसह 9 रोजी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. प्रवाशांच्या मागणीनंतर पाचोरा आगाराने नरमाईची भूमिका धेत याच दिवशी सायंकाळची 4.45 वाजेची भडगाव ते वाडे बस फेरी सुरू केली तर भडगावहुन सकाळी सहा वाजता वाडे येथे नवीन वाढीव बस फेरी 10 पासुन तात्पुरती सुरू करण्याचे तसेच पुढील आठवड्यानंतर सर्व बस फेर्‍या नियमीत सुरू राहण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
उपोषण सोडतेवेळी एस.टी.महामंडळाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरीक उपस्थित होते. बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना प्रवासाचा लाभ मिळणार असल्याने नागरीक, प्रवाशी वर्गातून समाधान मानले जात आहेत.



अचानक बस फेर्‍या बंदने गैरसौय
भडगाव ते वाडे मुक्कामे बस सह तीन बसफेर्‍या पाचोरा आगाराने 13 पासून अचानक बंद केल्या होत्या. तब्बल 25 ते 26 दिवसांपासून बस फेर्‍या बंद असल्याने भडगाव ते वाडे दरम्यान 10 ते 12 गावातील वृद्ध मंडळी, दिव्यांग व्यक्ती, नागरीक, विदयार्थी, प्रवाशांचे प्रवासासाठी हाल होत होते. एस.टी.महामंडळासह प्रशासनाला भडगावचे पत्रकार व वाडे येथील रहिवाशी अशोक परदेशी यांनी 2 व 7 रोजी भडगाव ते वाडे तिघही बंद बस फेर्‍या सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले मात्र सुस्त एस.टी.प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषणअस्त्र उगारण्यात आले.

उपोषणानंतर नरमले एस.टी.प्रशासन
आमरण उपोषणाला भडगाव तहसील कार्यालयासमोर शनिवार, 9 रोज सकाळी 11.30 वाजेपासून सुरुवात केली. उपोषणस्थळी एस.टी.महामंडळाचे अधिकारी, विविध संघटना, प्रवाशी, नागरीकांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला.

उपोषणस्थळी पाचोरा भडगाव बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक रमेश पाटील, वंचित बहुजन आघाडी भडगाव तालुका प्रमुख गोकुळ संसारे, प्रहार दिव्यांग संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष कर्तारसिंग परदेशी, जिल्हा सल्लागार राजु हरी परदेशी, भडगाव शहराध्यक्ष संजय कोळी, शहर सल्लागार भरत धोबी, तालुका सल्लागार गजानन तांबटकर, निंभोरा विकासोचे माजी चेअरमन निंबा पाटील, सुरेंद्र मोरे भडगाव, शिवदास महाजन, गोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिपक पाटील, नेहरु पाटील, महेंद्र मोरे, कोठली गोकुळ पाटील, राष्टृवादीचे माजी शहराध्यक्ष रमेश शिरसाठ, कुणाल शिरसाठ, वरखेड माजी उपसरपंच धनराज शिरसाठ, जुवार्डीचे भुषण पाटील, सामाजीक कार्यकर्ता विजय दोधा पाटील, वाडे येथील लक्ष्मण बोरसे, राजु परदेशी, मदन परदेशी, जयसिंग परदेशी, कैलास परदेशी, वडगाव, ओम पाटील, भाजपा कार्यकर्ता हेमंत पाटील निंभोरा, गफार खान, दीपक जाधव गोंडगाव, प्रतीक राजपुत वडगाव, कैलास पाटील भडगाव आदींनी भेट दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !