धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दिड लाखांचा विदेशी दारू साठा जप्त
शिरपूर तालुक्यातील कळमसरेच्या संशयीताविरोधात गुन्हा
Dhule Crime Branch’s Major Operation: Stock of Foreign Liquor Worth ₹1.5 Lakh Seized धुळे (2 जून 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या विदेशी दारू विक्री करणार्यांवर धडक कारवाई करत तब्बल एक लाख 53 हजार 600 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश जाटीराम पावरा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती की, कळमसरे, ता.शिरपूर रस्त्याच्या पुढे दहिवद गावाच्या शिवारातील एका शेतातील पत्री गोदामात अवैधरित्या विदेशी दारूचा साठा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी इम्पिरियल ब्लू या विदेशी दारूच्या 10 बॉक्समधील 48 बाटल्या तसेच रॉयल स्टॅग या ब्रँडच्या 4 बॉक्समधील 48 बाटल्या असा एकूण विदेशी दारूचा साठा जप्त केला. जप्त मालाची एकूण किंमत एक लाख 53 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रमेश जाटीराम पावरा या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.



