भुसावळातील गोकुळ नगरात रेल्वे कर्मचार्‍याकडे घरफोडी

50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


Burglary at Railway Employee’s Residence in Gokul Nagar, Bhusawal भुसावळ (3 जून 2026) : भुसावळ शहरातील गोकुळ नगर परिसरातील रेल्वे कर्मचार्‍याकडे घरफोडीची झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे 49 हजार 875 किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घराला टार्गेट
विनोद भगवान तायडे (33, पूजा कॉम्पलेक्स, गोकुळ नगर, भुसावळ) हे रेल्वेत ट्रॅकमॅन असून आपल्या कुटुंबासह लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले असल्याने कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली.

29 मे 2026 रोजी सायंकाळी तायडे कुटुंब शिंदी (ता.भुसावळ) येथे लग्नासाठी गेल्यानंतर 1 जून 2026 रोजी दुपारी घरी परतले. यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. घरातील लोखंडी कपाटातून लॉकरमधील दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

चोरट्यांनी सोन्याची पोत, कानातले तसेच चांदीचे दागिने मिळून एकूण सुमारे 49 हजार 875 किंमतीचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, परिसरात वाढत्या घरफोडी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !