लग्नाच्या आमिषाने 23 वर्षीय तरुणीवर जळगावसह धुळ्यात अत्याचार


23-year-old woman sexually assaulted in Jalgaon and Dhule under the pretext of marriage जळगाव (9 जून 2026) : लग्न करण्याच्या आमिषाने 23 वर्षीय तरुणीवर धुळ्यासह जळगावात विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीतेने जळगाव एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
23 वर्षीय तक्रारदार पीडीता मूळ धुळ्याची रहिवासी असून हल्ली ती जळगावातील एका भागात राहते. संशयीत शेख शाहीद फारुकशी तिची ओळख झाल्यानंतर त्याने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले व 17 एप्रिल 2024 ते 1 मे 2026 दरम्यान पीडीतेच्या आजीच्या घरी तसेच धुळ्यात भाडे तत्वावरील खोलीत पिडीतेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडीतेने या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयीत शेख शाहीद फारूख (जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात एपीआय माधुरी बोरसे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !