विवाहस्थळी बॅनरवर जन्मतारीख टाकून केली जनजागृती
नोकरी करणार्या कुटुंबाचे मुला-मुलीच्या विवाह सोहळ्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन
Public awareness was raised by displaying the date of birth on a banner at the wedding venue जालना (26 जून 2026) : भारत ’बालविवाह मुक्त अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी एका सामान्य कुटुंबाने पुढाकार घेतला. मुलीचे वडील हे एक बांधकाम व्यावसायिक असून.आपल्या उच्च शिक्षित मुलीच्या विवाह समारंभात बालविवाहविरोधी संदेश दिला.
सामान्यतः विवाह सोहळे हे केवळ कुटुंबीयांच्या आनंदाचा भाग मानले जातात. मात्र, ……..त्याला सामाजिक बाबदारीची जोड दिली. लग्नपत्रिका, बॅनर आणि फलकांवरून ’बालविवाह मुक्त भारत’ हा संदेश ठळकपणे मांडला. विवाहासाठी येणार्या प्रत्येक पाहुण्यापर्यंत हा संदेश पोहोचावा यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमासाठी ‘अॅक्सेस टू जस्टिस’ आणि ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन’ इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी जालना प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक नितीन जर्हाड व सुनील जगन हिवाळे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर जिल्हा जळगाव व नितेश चव्हाण, शुभम गोफणे यांनी मार्गदर्शन केले.


या विवाहला उपस्थित चाईल्ड हेल्प लाईनच्या सुपरवायझर मंगल उगले व श्रीमती लक्षी एखंडे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि कायदेशीर बाबी याबाबत लग्नाला आलेल्या वर्हाडींना माहिती दिली व इतरांनी सुद्धा अनुकरण करावे, असे आवाहन लक्ष्मण हिवाळे व बौद्धाचार्य शेषराव सोनवणे यांनी समाजाला केले.
