हाडाखेड चेक पोस्टवर साडेसात लाखांचा गुटखा : दोघांना अटक


Gutkha worth ₹7.5 lakh seized at Hadakhed check post; two arrested शिरपूर (12 जुलै 2026) : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्टवर राज्यात प्रतिबंधीत असलेला तब्बल सात लाख 53 हजारांचा गुटखा व तंबाखू अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीद्वारे वाहनातून जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सांगवीकडून शिरपूरच्या दिशेने येणार्‍या एका मध्यप्रदेश पासिंगच्या कारम (एम.पी.09 झेड.बी.3920) प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने एफडीएने हाडाखेड चेक पोस्टवर सापळा रचला. अधिकार्‍यांनी कार अडवून वाहनांची झडती घेतली असता कारमध्ये पान मसाला, गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळला. त्यात सहा हजार 340 गुटख्याचे पॅकेट्स आढळले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांत वाहन चालक अतुल ब्राह्मणे, सहचालक सौरभ ललवाणी, मालक हेमंत मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एफडीए सहायक आयुक्त गो.वी.माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !