शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी : चार तासात चोरटे जाळ्यात


Shirpur City Police Achievement : Thieves caught within four hours. शिरपूर (13 जुलै 2026) : शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या चार तासात चोरीचा उलगडा करीत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेली 14 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

काय घडले शिरपूरात ?
शिरपूरच्या बोहरी गल्ली, बालाजी मंदिराजवळ मनिष मोहनलाल अग्रवाल यांचे अक्षद ट्रेडिंग नावाचे किराणा दुकान आहे. 8 ते 9 दरम्यान चोरट्यांनी या दुकानाला लक्ष्य करीत कडी-कोयंडा तोडून गल्ल्यातील 14 हजारांची रोकड लांबवली. अग्रवाल यांनी शिरपूर शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्यापार्‍यांमधील सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी खबर्‍यांचे नेटवर्क व सीसीटीव्हीद्वारे लोहार गल्ली, शिरपूर येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
संशयीत मतीन खलील तेली व मकसूद अख्तर मेहतर (दोघे रा. लोहार गल्ली, शिरपूर) यांना बोलते केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत 14 हजारांची रोकड काढून दिली. विशेष चोरी केलेल्या रकमेत चिल्लरचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात चोरी उघडकीस आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !