धुळे एलसीबीची धडक कारवाई ; 16 किलो गांजासह शिरपूरातील दोघे गजाआड

वाहनासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त : गांजा विक्रेत्याचा कसून शोध


धुळे (शनिवार, 18 जुलै 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 16 किलो 664 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य गांजा विक्रेता पसार झाला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एका वाहनातून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने 15 जुलै 2026 रोजी धुळे-शिरपूर महामार्गावरील हॉटेल डीडीआरसी समोर सापळा रचला. संशयीत सियाज कार (क्रमांक एम.एच.47 सी.1008) आल्यानंतर तिला अडवून झडती घेतली असता वाहनात 16 किलो 664 ग्रॅम वजनाचा गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. संशयीत विनेश गुलाब पावरा (32) व ताराचंद उत्तरसिंग वळवी (34, दोघेही रा.उमर्दा, ता.शिरपूर, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी चौकशीत गांजा इरफान शकील पिंजारी (रा.शंभर फुटी रोड, जामचा मळा, धुळे) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. आरोपी अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार लाख 12 हजार रुपये किंमतीचा 16 किलो 664 ग्रॅम गांजा तसेच पाच लाखांची सुझुकी सियाज कार असा एकूण 9 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला


यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अमित साळी, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, अमोल पाटील, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राणी दामोदर, जगदीश सूर्यवंशी, सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !