धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शस्त्र हाताळणी व नेमबाजी प्रशिक्षण : हवालदार प्रवीण पाटील यांनी पटकावला प्रथम क्रमांक


धुळे (शनिवार, 18 जुलै 2026) : धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आर्वी येथील फायर बट येथे जिल्हास्तरीय शस्त्र हाताळणी व नेमबाजी प्रशिक्षणाचे सत्र क्रमांक 15 यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षण सत्रात एसएलआर रायफल व पिस्टल (रिव्हॉल्वर) सुरक्षितपणे कसे हाताळायचे तसेच गरज पडल्यास अचूक निशाणा कसा साधायचा? यावर प्रशिक्षण देण्यात आले. 37 प्रशिक्षणार्थींमधून धुळे तालुक्याचे प्रवीण पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

37 प्रशिक्षणार्थी सहभागी
या प्रशिक्षणाला पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, होम डीवायएसपी तसेच राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ज्युनियर व सिनियर अधिकारी तसेच अंमलदारांनी सहभाग घेतला. या सत्रात एकूण 37 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.


एसएलआर रायफल नेमबाजीत यांनी पटकावला क्रमांक
प्रथम क्रमांक : पोलीस हवालदार प्रवीण पाटील
द्वितीय क्रमांक : पोलीस कॉन्स्टेबल अमोल चौधरी
तृतीय क्रमांक : पोलीस कॉन्स्टेबल गणेश कदम

पिस्टल फायरिंगमध्येही प्रशिक्षणार्थींनी उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन केले.

हे शस्त्र हाताळणी व फायरिंग प्रशिक्षण राखीव पोलीस उपनिरीक्षक मणीलाल पवार तसेच पोलीस मुख्यालयातील सर्व प्रशिक्षक वर्ग यांच्या अथक परिश्रमातून नियमितपणे राबविण्यात येत आहे. धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौशल्य, आत्मविश्वास आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्यास या प्रशिक्षणाचा मोठा हातभार लागत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !