नशिराबाद पोलिसांची कुंटणखान्यावर कारवाई : दोघांना अटक, दोन पीडीतांची सुटका


Nashirabad police raid a brothel : Two arrested, two victims rescued जळगाव (मंगळवार, 21 जुलै 2026) : नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या एका शेतात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करीत दोन पीडीतांची सुटका केती स्थानिक दोघांना अटक केली. घटनास्थळावरून 91 हजार 60 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना नशिराबाद ते सुनसगाव रोडवरील एका शेतात अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या अनुषंगाने त्यांनी खात्री केल्यानंतर पथकाला कारवाईचे निर्देश दिले. मंगळवारी 2.20 वाजेच्या सुमारास पथकाने प्रदीप जनार्दन रोटे (57) व कैलास संजय भोई (दोन्ही राहणार नशिराबाद) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरून व संगनमताने हा कुंटणखाना चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली तर दोघा पीडीतांची सुटका करण्यात आली. गुन्ह्याशी संबंधित रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून एकूण 91 हजार 60 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेड, हवालदार गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार, भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !