भुसावळातील वीज कंपनीचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भर पावसात वीज कंपनीच्या अधिकार्‍याला कारवाईचा शॉक : दोन हजारांची लाच घेताना कारवाई


गणेश वाघ
Additional Executive Engineer of Bhusawal power company caught in Jalgaon ACB’s trap. भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : भुसावळ शहरातील वीज कंपनीच्या बड्या अभियंत्याला दोन हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने शहरातील लाचखोर अधिकारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. नितीन पाटील असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव असून त्यांच्याकडे वीज वीज वितरण कंपनीतील अतिरीक्त अभियंता (वर्ग एक) जवाबदारी असल्याचे समजते.

अत्यंत गोपनीय पद्धत्तीने सापळा
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक रेशमा अवतारे व सहकार्‍यांनी बुधवारी दुपारीच भुसावळ गाठत सापळा रचला. एका प्रकरणात काम करून देण्यासाठी वर्ग एकचा अधिकारी नितीन पाटील याने लाच मागितल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली व बुधवारी दुपारी सापळा रचण्यात आला. अधिकार्‍याने लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने सापळा यशस्वी केला.

(एसीबीकडून सविस्तर कारवाईची माहिती मिळताच आम्ही बातमी अपडेट करू)





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !