सहाशे रुपयांची लाच भोवली : बोदवड पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹600 proves costly: Bodwad Panchayat Samiti Junior Assistant falls into Jalgaon ACB’s trap भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला सहाशे रुपयांची लाच घेताना जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने पंचायत समिती वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. उमेश श्यामकांत सपकाळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

मानधन तत्वावरील कर्मचार्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवण्यासाठी आरोपी सपकाळे याने लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा यशस्वी करण्यात आला.
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात डॅशिंग निरीक्षक स्मिता नवघरे व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.