धुळ्यात एसीबीचा मोठा सापळा यशस्वी : बहुजन कल्याण अधिकारी लाचेच्या जाळ्यात
10 लाखांचे बिल काढण्यासाठी मागितली 20 हजारांची लाच : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ
गणेश वाघ
Major ACB trap successful in Dhule : Bahujan Welfare Officer caught in bribery net भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : दहा लाख रुपयांच्या कामाचे बिल काढण्यासाठी तडजोडीअंती दोन टक्के प्रमाणे 20 हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यातील बहुजन कल्याण अधिकार्याला धुळे एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

विशाल चौधरी असे अटकेतील लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदार कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या कामाचे दहा लाखांचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात धुळ्यातील इतर मागासवर्ग बहुजन अधिकारी विशाल चौधरीने सुरूवातीला 25 हजारांची लाच मागितली व 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा गुरुवारी दुपारी यशस्वी करण्यात आला.
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.