धुळ्यात एसीबीची मोठी कारवाई : 40 हजारांची लाच पोलीस ठाण्यातच स्वीकारणार्‍या फौजदारासह कर्मचार्‍याला अटक

तडजोडीअंती स्वीकारली लाच : लाचेच्या सापळ्याने धुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ


गणेश वाघ
Major ACB operation in Dhule: Sub-Inspector and staffer arrested for accepting a ₹40,000 bribe right inside the police station भुसावळ (3 ऑगस्ट 2026) : लोन प्रकरणात न्यायालयाकडून से मागण्यात आल्यानंतर या प्रकरणात मदत करण्यासाठी सुरूवातीला 50 हजारांची लाच मागून 40 हजारात तडजोड करीत पोलीस ठाण्यात लाच स्वीकारणार्‍या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला एसीबीने अटक केली आहे. हा सापळा सोमवारी सायंकाळी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात यशस्वी करण्यात आला. पोलीस ठाण्यात झालेल्या लाचेच्या कारवाईने धुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर व पोलीस कर्मचारी अविनाश सादरे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हा सापळा धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचार्‍यांनी यशस्वी केला.

(हा सापळा आत्ताच झाल्याने एसीबीच्या अधिकृत माहितीनंतर आम्ही बातमी सविस्तर अपडेट करू)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !