धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गावठी कट्टा व जिवंत राऊंडसह संशयित ताब्यात


धुळे (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : अवैध शस्त्र बाळगणार्‍यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयितास गावठी कट्टा व जिवंत राऊंडसह ताब्यात घेतले. मंजूर शाह डब्बू शाह (36, गवळी वाडा, जामा मशिदमागे, मोगलाई, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीताबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाला निर्देश मिळताच वलवाडी, जय संतोषी माता कॉलनी, धुळ्यातील नदीकिनारी पुलाच्या बाजूच्या रोडवरून संशयीत मंजूर शाह डब्बू शाह (36, गवळी वाडा, जामा मशिदमागे, मोगलाई, धुळे) यास ताब्यात घेण्यात आले. रविवार, 30 रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून देशी गावठी कट्टा (पिस्तूल) मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतूस मिळून 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने सुमारे दीड वर्षापूर्वी मध्यप्रदेशातील उमर्टी येथून शस्त्र खरेदी केल्याची माहिती दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा.निरीक्षक दीपक ढोके, पोलीस अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर आणि आशिषकुमार वानखेडे आदींच्या पथकाने केली.

 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !