धुळे गुन्हे शाखेची कारवाई : दहशतीसाठी तलवार बाळगणार्या न्याहळोदच्या तरुणाला अटक
धुळे (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) : दहशत निर्माण करण्यासाठी तलवार बाळगणार्या 24 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तरुणाकडून दोन हजार रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. राहुल भीमराव अहिरे (24, रा.न्याहळोद, ता.जि.धुळे) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाडी-याहोळे रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एक तरुण तलवार बाळगून असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. राहुल अहिरेविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल.



