निधन वार्ता : प्रभाकर सावळाराम नाईक : उद्या अंत्ययात्रा
भुसावळ (मंगळवार, 15 सप्टेंबर 2026) : शहरातील शारदा नगरातील एन.के.नारखेडे विद्यालयाजवळील महागणपती प्लाझातील रहिवासी तथा आयुध निर्माणी भुसावळचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर सावळाराम नाईक (80) यांचे मंगळवार, 15 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते आयुध निर्माणी भुसावळचे कर्मचारी तथा पुरोहित तुषार नाईक यांचे वडील होत.
